माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी वसूलणाऱ्या तिघा बहाद्दरांवर गुन्हे शाखेकडून मोक्का अंतर्गत कारवाई…!
पुणे : माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली नगर मार्गावरील फिनिक्स मॉल मधील एका व्यापाऱ्याकडून खंडणी मागणाऱ्या बहाद्दर व त्याच्या साथीधारांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये अर्थात मुक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , रवींद्र जयप्रकाश ससाणे (खुळेवाडी, विमान नगर), मंगल रमेश सातपुते (धानोरी), दीपक संपत गायकवाड यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे .
नगर मार्गावरील फिनिक्स मॉल मध्ये व्यापाऱ्याचे दुकान असून दुकानात आलेल्या मालमोटारीतील माल उतरवण्यासाठी कामगारांना या तिघांनी अडवले माथाडी संघटनेचे कार्यकर्तेची असल्याची बतावणी करून व्यापाराकडे खंडन ची मागणी केली,मालमोटारीतील माल उतरण्याचे काम आमच्या संघटनेला मिळाले पाहिजे असे सांगून त्यांनी व्यापाऱ्याकडून खंडणी उकळली होती याप्रकरणी व्यापाऱ्याने पोलिसात तक्रारी दिली ससाणे आणि साथीदारा विरोधात मोका कारवाई करण्याचा प्रस्ताव विमान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास सोंडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मंगेश जगताप, उपनिरीक्षक एस एस कोळूरे, उमेश भेंडे, सचिन जाधव, चंदन तोडकर यांनी तयार केला पोलीस आयुक्तांनी यावर मोक्का कारवाईच्या आदेश दिले.