दर्शना पवार हत्याकांडात आरोपी राहुल हंडोरे याची ‘ती’ एक चूक झाली आणि सगळा प्लॅन फसला, वाचून व्हाल थक्क…
पुणे : पुण्यातील वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी तरुणीचा मृतदेह आढळ्याने खळबळ उडाली होती. दर्शना दत्तू पवार असे या मृत तरुणीच नाव असून ती नुकतीच एमपीएससी परिक्षेत पास झाली असून तिची वन परिक्षेत्र अधिकारीपदी निवड झाल्याचेही माहिती मिळाली होती.
त्यावरून पोलिसांनी आपली सूत्रे कामाला लावून दर्शनाच्या मारेकऱ्यांना शोधण्यात यश आले. हत्या झाल्यानंतर तिचा मारेकरी राहुल हंडोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. दर्शना ही अखेरची तिचा मित्र राहुल सोबत राजगडावर जाताना दिसली होती.
तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात राहुल एकटाच गडावरून खाली येताना दिसत होते. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होती. अखेर पोलिसांना राहुलला मुंबई येथून अटक करण्यात यश मिळाले. दर्शनाची हत्या करणाऱ्या राहुलने एक चूक केली आणि तो पोलिसांना सापडला.
राहुल ज्यावेळी दर्शनाला राजगड या ठिकाणी घेऊन आला होता त्यावेळी तो तिला बाईकवर घेऊन आला होता. त्यामुळे त्याची तीच चूक त्याला चांगलीच भोवली. तो बाईकवर आल्यामुळे दर्शनाच्या हत्येची माहिती समजताच पोलिसांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज चेक केल्या आणि त्यामध्ये हे दोघे बाईकवर जाताना दिसले.
त्यामुळे पोलिसांना राहुलवर संशय आला. आणि त्यामुळे पोलिसांनी राहुलचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने खून कसा केला? त्यानंतर कोणाला याबाबत समजू नये म्हणून कसा लपून बसला होता? याची माहिती दिली आहे.
हा सर्व घटनाक्रम पोलिसांनी सांगितला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो खून करून रेल्वेने सांगलीला गेला. तेथे न थांबता तो गोव्याला निघून गेला. गोव्यावरून त्याने चंदीगड आणि तेथून पश्चिम बंगाल येथील हावडा गाठले.
परत त्याने तेथून मुंबई गाठली. परंतु पोलिसांची दिशाभूल व्हावी यासाठी त्याने मोबाइल बंद ठेवला होता. स्थानिक फोनवरून तो आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला संपर्क साधत होता.
संपर्क साधल्यानंतर तो लगेचच आपले ठिकाण बदलत होता. मात्र पोलिसांना याची माहिती फोन मागणाऱ्या प्रवाशांनी दिली आणि पोलिसांना त्याला चार दिवसात अटक करण्यात यश आले.