जेजुरीला देवदर्शनासाठी चाललेल्या वाहनाचा अपघात, २ जण ठार, १४ जण गंभीर जखमी..

Jejuri Accident : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर सोमवती यात्रा सुरू आहे. या यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी गडावर पाहायला मिळते. सोमवती यात्रेनिमित्त श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा कऱ्हा नदीवर स्नानासाठी जात असतो.
अशातच आता जेजुरी दर्शनासाठी येणार्या भाविकांचा बेलसर वाघापूर रस्त्यावर पिकअप ट्रक आणि आयशर गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, १४ जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
पिकअप ट्रकमधील भाविक दर्शनासाठी जात होते. मात्र, रस्त्यावर त्यांचा अपघात झाला. सध्या जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. जेजुरी गडावर भाविकांची दर्शनासाठी बाराही महिने रेलचेल सुरू असते. सोमवती यात्रेनिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
मात्र सोमवारी ३० डिसेंबरला बेलसर वाघापूर रस्त्यावर पहाटे अडीच वाजता दोन वाहनांचा अपघात घडला आहे. पिकअप ट्रक आणि आयशर गाडीचा अपघात घडला असून, या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १४ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
सोमवती यात्रेनिमित्त प्रवासी जरेवाडी येथून सर्व भाविक जेजुरीला, खंडोबा देवाच्या देवदर्शनासाठी निघाले होते. मात्र, प्रवास करीत असतानाच पिकअप ट्रक आणि आयशर गाडीची एकमेकांना धडक बसली. हा अपघात पहाटे अडीच वाजता घडला.
दरम्यान, या अपघातात पिकअप गाडीतील जितेंद्र तोतरे आणि आशाबाई जरे या दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.तर, १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त व्यक्तींवर जेजुरी येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून, जखमी झालेल्या व्यक्तींच्या हाता – पायांना मोठी दुखापत झाली असल्याची माहिती आहे.