Accident News : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात! गाडीचा अक्षरशः चक्काचुर, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी, चालकाचा ताबा सुटल्याने घडली घटना…


Accident News : राज्यात अलीकडे अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. तसेच समृद्धी महामार्ग अपघाताचे केंद्र बनले आहे. हा महामार्ग झाल्यापासून तो सतत चर्चेचा विषय बनत आहे. कारण सतत या ठिकाणी अपघात घडत असतात.

त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अनेकांचे संसार उध्वस्त होतात. सध्या देखील अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कार चालकाचा ताबा सुटून गाडी डिव्हायडरला जाऊन आदळली आणि गाडीचा भीषण अपघात झाला.

वैजापूरजवळ हा भीषण अपघात झाला असून हे दोघंही भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आहेत. मदत वेळेवर पोहोचल्यामुळे दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. या गाडीत दोघेच जण होते आणि त्यांना सुदैवाने अपघातात जीवितहानी झालेली नाही. Accident News

नुकतंच समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ यांनी केले. भरवीर ते इगतपुरी हा समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा असून समृद्धी महामार्गाचं ७०१ किमी पैकी ६२५ किमी काम पूर्ण झालं आहे. लोकार्पणानंतर भुजबळ यांनी देखील अपघाताबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!