Accident News : पुणे-नगर महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात, रस्ता तात्पुरता सिल, पर्यायी मार्ग सुरू…

Accident News : पुणे नगर महामार्गवर सध्या अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील वडगाव शेरी परिसरात पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. येथून गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला आहे. यामुळे मोठी पळापळ झाली.
या टँकर मधून मोठ्या प्रमाणात वायू गळती होत आहे. यामुळे काहीवेळा भीती निर्माण झाली होती. या अपघातानंतर घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. अपघातानंतर याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. Accident News
दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी टँकरवर स्प्रे मारणे सुरू केले. यानंतर पोलिसांनी हा रस्ता तात्पुरता सिल केला.
नंतर पर्यायी मार्गाने वाहने वळवली आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी अजून दोन-तीन तासांचा वेळ लागणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा टॅंकर पुण्याहून नगरच्या दिशेने चालला होता. यावेळी चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. याबाबत तपास सुरू आहे.