Accident News : सोरतापवाडी परिसरात भीषण अपघात, दुचाकीने ट्रकला दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर..

Accident News : राज्यात अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वमूवीर पुन्हा एकदा अपघाताची घटना समोर आली आहे. पुणे – सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी फाटा परिसरात दुचाकीने ट्रकला पाठीमागून जोरात दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना गुरुवारी (ता.१४) सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली आहे. शुभम धबडे असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुनील विकास घोडके (वय.२५, रा. दोघेही, रा. सोलापूर) असे अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. Accident News
सविस्तर माहिती अशी की, शुभम धबडे व सुनील घोडके हे दुचाकीवरून उरुळी कांचनच्या बाजूने निघाले होते. यावेळी दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीने पाठीमागून समोर निघालेल्या ट्रकला जोरदार पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात शुभम धबडे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, सदर अपघातातील सुनील घोडकेला उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक रुग्णालयात कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम व त्यांच्या साथीदारांच्या मदतीने हलविण्यात आले आहे. सदरचा अपघात कसा झाला याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.