Accident News : आसाममध्ये भाविकांच्या बसवर काळाचा घाला, अपघातात १२ जणांचा मृत्यू, २५ जखमी..

Accident News : आसाममधील गोलाघाटच्या डेरगावजवळील बलिजान परिसरात आज बुधवारी (ता.३) पहाटे पाचच्या सुमारास भाविकांच्या बसला अपघात झाला असून, यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, भाविकांना घेऊन जाणारी बस गोलाघाट जिल्ह्यातील कमरबंधा भागातून तिलिंगा मंदिराकडे जात होती. बालिजान परिसरात बसची ट्रकला धडक बसली. अपघात झाला त्यावेळी जोरहाटकडून ट्रक विरुद्ध दिशेने येत होता.
दोन्ही वाहनांमध्ये झालेल्या धडकेत बसमधील १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. Accident News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोलाघाट जिल्ह्यातील डेरगावजवळील बालिजान भागात हा अपघात झाला. गोलाघाट एसपींनी सांगितले की, भाविकांना घेऊन जाणारी बस गोलाघाट जिल्ह्यातील कमरबंधा भागातून तिलिंगा मंदिराकडे जात होती. बालिजान परिसरात बसची ट्रकला धडक बसली. अपघात झाला त्यावेळी जोरहाटकडून ट्रक विरुद्ध दिशेने येत होता.
एसपी म्हणाले की, घटनास्थळावरून १० मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून ते डेरगाव सीएचसीमध्ये पाठवण्यात आले आहेत. तर २७ जखमींना जोरहाट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते, जिथे दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.