Accident News : दुर्दैवी! कोरेगावमुळ इनामदारवस्ती येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत उरुळी कांचन येथील एकचा मृत्यू…


Accident News उरुळी कांचन : कोरेगावमुळ इनामदारवस्ती (ता. हवेली) येथे गुरूदत्त नर्सरी जवळ सोलापुर पुणे हायवे रोडवर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत उरुळी कांचन येथील एकचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

हा अपघात मंगळवारी (ता.१२) रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कोरेगावमुळ इनामदारवस्ती (ता. हवेली) येथे गुरूदत्त नर्सरी जवळ सोलापुर पुणे हायवे रोडवर झाला आहे

नितीन एकनाथ खेडेकर (वय.५२ रा खेडेकरमळा उरूळीकांचन ता.हवेली जि.पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकणी मंगेष गिताराम खेडेकर ( वय.३५ वर्षे व्यवसाय शेती रा.खेडेकरमळा उरूळीकांचन ता.हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Accident News

मिळालेल्या माहिती नुसार, मंगळवारी (ता.१२) रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव मुळ इनामदार वस्ती येथे गुरूदत्त नर्सरी जवळ सोलापुर पुणे हायवे रोडवर पुणे बाजुकडे जाणारे लेनवर फिर्यादी यांचा चुलता भाऊ नितीन खेडेकर हे आपल्या मोटार सायकलने उरूळीकांचन कडे येत असताना यावेळी त्यांच्या मोटार सायकलला कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिली.

या धडकेत त्यांच्या मोटार सायकलचे नुकसान होऊन नितीन खेडेकर यांना डोकीस व इतर ठीकाणी गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वाहन चालक तेथून फरार झाला.

याप्रकणी मंगेष गिताराम खेडेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास उरुळी कांचन पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक शंकर पाटील हे करीत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!