Accident News : भरधाव कारने १० ते १२ जणांना उडवले, महिलेचा जागीच मृत्यू, पाहा धक्कादायक व्हिडीओ…
Accident News : सध्या अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे.. बुधवारी रात्री एका अनियंत्रित कारने एकामागून एक १० ते १२ जणांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
धडकेनंतर चालकाने कारसह घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे जमाव संतप्त झाला. संतप्त जमावाने आरोपीला जागीच पकडून बेदम मारहाण केली. ही घटना पूर्व दिल्लीतील गाझीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील मयूर विहार फेज-3 येथील मार्केटमध्ये घडली आहे.
सीता देवी (वय. २२, रा. खोडा कॉलनी, गाझियाबाद) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, दिल्लीतील गाझीपूर भागात प्रत्येक बुधवारी आठवडी बाजार भरतो. त्यामुळे बाजारात खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. बुधवारी रात्री आठवडी बाजार भरलेला असताना, अचानक एक कार अनियंत्रित होऊन बाजारात घुसली. काही क्षणातच कारने १० ते १२ जणांना चिरडले.
#WATCH | Ghazipur, UP: One died and 6 were injured after a car hit several people on Wednesday late evening. The injured are under treatment in Lal Bahadur Shastri Hospital. The car driver is also injured and is undergoing treatment. The police have taken him into custody and… pic.twitter.com/JVEBqlrzmV
— ANI (@ANI) March 13, 2024
अपघात इतका भीषण होता, की कार थेट एका दुकानात शिरली. या घटनेत कारखाली आल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर ६ ते ७ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये ५ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिक चांगलेच संतापले होते. Accident News
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.