येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अभिजित बिचुकले यांची मोठी घोषणा..

पुणे : बिग बॉस फेम अभिजित बिचुकले अनेकदा चर्चेत असतात. अनेकदा निवडणूका त्यांनी लढवल्या आहेत. मात्र त्यांना अजून यश आले नाही. असे असताना आता अभिजित बिचुकले यांनी मोठी घोषणा केली आहे.
सावधान! उन्हाळ्यात लहान मुलांना मोबाईल देऊ नका, शिरूरमध्ये मोबाईल गरम होऊन स्फोट झाल्यामुळे
विधानसभेच्या 288 जागा लढणार असल्याचे बिचुकले यांनी जाहीर केले आहे. तसेच मुलींना दहावी पर्यंतचे शिक्षण मोफत द्यावे अशी मागणी देखील बिचुकले यांनी केली आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाच्या अनुषंगाने राज्य शासनाने बालवाडी ते 10 वी पर्यंतचे मुलींना सर्व शाळांमध्ये मोफत शिक्षण द्यावे अशी मागणी देखील बिचुकले यांनी केली. याबाबत बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.
नातेवाईक शरीरसुखाची मागणी करतोय, पोलिस लक्ष देत नाहीत, अजितदादांच्या ऑफिसमधून फोन गेला अन्..
दरम्यान, पुणे पोटनिवडणुकीत अभिजीत बिचुकले यांचा दारुण पराभव झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा त्यांनी याबाबत निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.
काय सांगता! सेक्सला खेळ म्हणून मान्यता, आता रंगणार सेक्स चॅम्पियनशिप..
नेहमीच आपल्या विधानामुळे चर्चेत येणारे अभिजीत बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला होता. बिचुकले यांनी वर्षावर मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.