आमिर खान एका लेकराच्या आईच्या प्रेमात, ६० व्या वर्षी थाटणार तिसरा संसार?, अभिनेत्याने स्वतःच केला खुलासा…

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान नेहमीच त्याच्या चित्रपटांप्रमाणे वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहतो. यंदाचा त्याचा वाढदिवसही काहीसा वेगळा ठरला. १४ मार्चला त्याच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधीच त्याने प्रसारमाध्यमांसोबत हा आनंद साजरा केला आहे.
विशेष म्हणजे, यावेळी त्याने त्याच्या नव्या प्रेमसंबंधांची अधिकृतरित्या घोषणा केली आहे. त्याच्या ६०व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच त्याने त्याच्या लव्ह लाइफची घोषणा केली आहे. आमिरने त्याच्या गर्लफ्रेंडला थेट मीडियासमोरच आणलं आहे. लवकरच आमिर तिसरं लग्न करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
आमिर खानचा उद्या १४ मार्च रोजी ६०वा वाढदिवस आहे. एक दिवस आधीच आमिरने पॅपराजींसोबत वाढदिवस दणक्यात साजरा केला. यावेळी त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहे. आमिरने केवळ वाढदिवसच साजरा केला नाही तर त्याची गर्लफ्रेंड गौरीचीही पॅपराजीशी भेट घालून दिली.
मात्र गौरीचा फोटो कोणत्याच सोशल मीडियाला पोस्ट झालेला नाही. आमिरने प्रायव्हसीचा भाग म्हणून गौरीचे फोटो शेअर न करण्यास पॅपराजींना सांगितलं. आमिरची नवी गर्लफ्रेंड बॉलिवूडशी संबंधित नाही. ती बंगळुरूची राहणारी आहे. दोघेही दोन ते तीन वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. विशेष म्हणजे गौरीला एक ६ वर्षाचा मुलगाही आहे.
दरम्यान, आमिर खानने अलीकडेच गौरीची ओळख आपल्या कुटुंबीयांना आणि दशकांपासूनचे मित्र असलेल्या शाहरुख खान आणि सलमान खानला करून दिली. १२ मार्च रोजी या दोन्ही अभिनेत्यांनी आमिरच्या घरी जाऊन गौरीची भेट घेतली. या भेटीनंतर सोशल मीडियावर या नात्याची अधिक चर्चा सुरू झाली