टिळेकरवाडीत तरुणावर कटरने सपासपा वार ! उरूळीकांचन पोलिसांनी आरोपीला ठोकल्या तात्काळ बेड्या ….!!
उरुळीकांचन : तु पोरीचे मागे का फिरतो’ असे म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशाने एकावर कटरने वार केल्याची घटना
टिळेकरवाडी (ता.हवेली) येथे शनिवार दि.१७ रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनीआरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे.
शुभम बलभिम सुर्यवंशी (वय 20 रा. टिळेकरवाडी ता.हवेली जि.पुणे ) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर चैतन्य कांबळे (रा. आश्रमरोड उरूळी कांचन ता.हवेली जि.पुणे ) असे हल्ला करण्याऱ्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्यावर बी.एन.एस कलम १०९ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी चैतन्य कांबळे याने शुभम सुर्यवंशी याला टिळेकरवाडी येथील चैकात मला बोलावून घेउन ‘तु पोरीचे मागे का फिरतो’ असे म्हणून शुभमला धमकावून लागला. त्यानंतर त्याने आपल्याकडील कटरने शुभमच्या हातावर पोटरीवर , बरगडीवर तसेच दंडावर कटरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी घटनेची माहिती मिळताच उरुळीकांचन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी चैतन्य कांबळेला तात्काळ ताब्यात अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक कांबळे हे करीत आहे