बायकोशी वाद घालणाऱ्या महिलेला नवऱ्याने जागेवरच संपवलं, दोघींच्या वादात पडल्याने धक्कादायक घटना…

नंदुरबार : नंदुरबारच्या मलोणी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन महिलांच्या भांडणात बायकोशी वाद घालणार्या महिलेला तिच्या नवऱ्यानं जागेवरच संपवल्याची घटना समोर आली आहे.
तसेच या प्रकरणी आरोपी महिला आणि पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. या हत्येच्या घटनेनंतर नंदुरबारमधील शहादा येथे आक्रमक आदिवासी समाजानं बंदची हाक दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की, २९ डिसेंबरला रात्री ८ च्या सुमारास नंदुरबारच्या मलोणी परीसरात दोन महिलांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. दिपाली सागर चित्ते आणि रिज्जु मुस्लीम कुरेशी या दोन्ही महिलांमध्ये टोकाचे भांडण झाले.
दरम्यान, भांडणानंतर दिपाली आणि तिचे नातेवाईक रिज्जूच्या घरी गेले. दोन्ही गटात पुन्हा वाद झाला. रिज्जूच्या पतीला राग अनावर झाला आणि त्यानं चाकू काढत दिपालीवर वार करत हत्या केली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.