शौचास बसलेली महिला 18 व्या मजल्यावरून कोसळली, मुंबई धक्कादायक माहिती आली समोर, नेमकं काय घडलं?

मुंबई : मुंबईतील वडाळा भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका सोसायटीमधील इमारतीच्या 18 व्या मजल्यावरुन पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सध्या पोलीस तपास करत आहेत.

याबाबत माहिती अशी की, इमारतीच्या लिफ्टजवळील खुल्या डक्टजवळ शौचाला बसलेली व्यक्ती थेट 18 व्या मजल्यावरुन खाली कोसळली. या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून याबाबत सध्या चौकशी सुरु आहे. या व्यक्तीचं पोट खराब झाले होते, घरातील टॉयलेटमध्ये आधीच कुणीतरी गेल्यामुळे त्याला सहन झाली नाही. त्यामुळे लिफ्टच्या बाजूच्या खुल्या डक्टच्या शेजारी सदर व्यक्ती शौचास बसली.
असे असताना तिचा यावेळी पाय घसरल्याने ती खुल्या डक्टमधून थेट इमारतीच्या 18 व्या मजल्यावरुन खाली कोसळली. अग्निशमन दलाच्या मदतीने सदर व्यक्तीचा मृतदेह तळ मजल्याच्या डक्टमधून बाहेर काढला. या घटनेमुळे याठिकाणी उपस्थित लोकांची मोठी पळापळ झाली.

दरम्यान, संबंधित मृत व्यक्ती बहिणीसोबत मातोश्री सदन नावाच्या इमारतीमध्ये राहत होती. काही दिवसांपासून त्या व्यक्तीचं पोट बिघडलं होतं. ती आजारी होती. इमारतीच्या लिफ्टच्या बाजूला असलेल्या खुल्या डक्टच्या ठिकाणी शौचास बसली, नंतर तिचा पाय घसरल्याने तिचा मृत्यू झाला.