कोरेगाव मुळच्या ग्रामपंचायत सदस्याने ‘तू मला खूप आवडतेस’ असे म्हणत महिलकडे केली शरीर सुखाची मागणी ; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मुळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सदस्याने एका महिलकडे शरीर सुखाची मागणी करून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सदर प्रकार (१३ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता व १७ मे) रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन गुलाब निकाळजे (रा. कोरेगाव मुळ, ता. हवेली) असे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ३० वर्षीय पिडीत महिलेनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला काम करुन घरी जात असताना आरोपी सचिन निकाळजे याने चारचाकी गाडीतून फिर्यादींचा पाठलाग करून फिर्यादी यांना थांबविले. त्यानंतर आरोपीने त्यांचा हात पकडून ‘तू मला खूप आवडतेस, तु मला हवी आहेस’, असे म्हणून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
दरम्यान, आरोपीने फिर्यादी यांच्या घरात प्रवेश करुन त्यांची साडी ओढून शरीर सुखाची मागणी केली. फिर्यादी यांनी आरोपीला धक्का दिला असताना त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच झाल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी आरोपी सचिन निकाळजे याच्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.