अजित पवारांचे बंड फसणार! राज्यात पुन्हा तिसरा भूकंप येणार, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा…
मुंबई : सध्या राष्ट्रवादी पक्षामध्ये अजित पवार गट आणि शरद पवार असे दोन गट तयार झाले आहेत. अजित पवार यांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा केल्याने राज्याचे राजकारण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे.
यामुळे राज्य सरकारवर टीकेचा सामना करावा लागत आहे. यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे अजित पवारांचा बंड पुन्हा एकदा फसणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादीतील किती आमदार अजित पवार यांच्या पाठिशी आहेत, हे अजूनही निश्चित झाले नसल्याने पक्षांतर बंदी कायद्यानुसार, अजित पवारांसह त्यांच्यासोबत शपथ घेतलेले राष्ट्रवादीचे सर्व मंत्री निलंबित होणार.
तसेच महाराष्ट्रातील सरकार वैध आहे की अवैध सरकार आहे हे त्यावरून निश्चित होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवसेना निलंबनाबाबत 10 ऑगस्टपर्यंत निकाल द्यावा लागेल, असेही ते म्हणाले.
तसेच या सर्व परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. यामुळे येणाऱ्या काळात अस काही घडलं तर मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.