कोकण कड्यावरून उडी घेत तलाठी आणि तरुणीने संपवलं जीवन, चिठ्ठीत सगळंच उघड झालं, भयंकर माहिती आली समोर…

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात दुर्गवाडी कोकणकड्यावरून १३०० फूट खोल दरीत उडी घेऊन एका तलाठीसह तरुणीने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मृतांमध्ये श्रीगोंदा येथील तलाठी रामचंद्र साहेबराव पारधी (वय.४०) आणि जुन्नर येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी रुपाली संतोष खुटाण यांचा समावेश आहे.
वर्तविण्यात आला होता. मात्र, श्रीगोंद्याचे तलाठी रामचंद्र पारधी आणि जुन्नर येथील कॉलेज विद्यार्थिनी रुपाली संतोष खुटाण यांनी अशाप्रकारे निर्जनस्थळी आत्महत्या केल्यामुळे याप्रकरणाचे गूढ वाढले होते. पोलिसांना या दोघांच्या मृतदेहाजवळून सुसाईड नोट सापडल्या होत्या. त्यामध्ये रामचंद्र पारधी आणि रुपाली खुटाण यांनी आपल्या आत्महत्येचे कारण नमूद केले आहे.
तीन दिवसांपासून दुर्गवाडी कोकणकड्याच्या परिसरात पांढऱ्या रंगाची कार उभी असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. कारजवळून एक पुरुष आणि एक स्त्रीच्या चपला आढळून आल्याने दरीत शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यात दोघांचे मृतदेह तब्बल १२०० फूट खोल दरीतून शोधून बाहेर काढण्यात आले.
रामचंद्र पारधी यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे की, “मी रामचंद्र साहेबराव पारधी आपल्या आई-वडील व भावाची माफी मागतो. माझी पत्नी आणि तिच्या नातेवाईकांनी मानसिक त्रास दिला आहे.
पत्नी आणि तिच्या नातेवाईकांविरोधात कायदेशीर कारवाई करा.” तर रूपाली खुटाण हिनेदेखील आपल्याला आईवडिलांकडून होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, या दोघांच्या सुसाईडच्या आधारे पोलिसांनी आता तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणी दोन्ही मृतांच्या नातेवाइकांना बोलावून चौकशी केली जात आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.