माझ्या आजुबाजूला मृतदेहांचा खच अन् विमानाचे तुकडे, अहमदाबाद दुर्घटनेतील वाचलेल्या प्रवाशाने सांगितला थरार…


अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील मेघानी परिसरात काल दुपारी (ता.१२) एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण अपघात झाला. त्यावेळी विमानात २४२ प्रवासी होते. अहमदाबाद एअरपोर्टवरून टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही क्षणातंच हे विमानत मेघानी परिसरातील नागरी वस्तीतील इमारतीवर कोसळले.

त्यामुळे मोठी जीवित हानि झाली असून अक्षरश: हाहा:कार उडाला आहे. मात्र या भीषण अपघातातून फक्त एकच प्रवासी वाचला तो म्हणजे रमेश विश्वकुमार (वय.४०), सीट नंबर 11A. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, स्वतः रमेश यांनी आपल्या थरारक अनुभवाची माहिती दिली आहे.

रमेश यांनी सांगितले की, विमानाचा ज्या भागात माझी सीट होती तो कदाचित इमारतीच्या खालच्या भागात आदळला असावा. वरच्या भागात मोठी आग लागली होती. मी सीटसह खाली फेकलो गेलो आणि त्या भागातून कसा तरी रेंगाळत बाहेर पडलो. दरवाजा तुटलेला होता, समोर रिकामी जागा दिसताच मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.

माझ्या डोळ्यासमोर दोन एअर होस्टेस आणि एक काका-काकू पूर्णपणे जळत होते. लोक आगेमध्ये अडकले होते आणि मदतीसाठी आरडाओरड करत होते, असे सांगताना रमेश यांचा आवाज भरून आला. अपघातात त्याचा डावा हात गंभीरपणे भाजला आहे, पण त्यांचा जीव वाचला, हेच त्यांच्या कुटुंबासाठी सध्या आश्वासक ठरतं आहे

रमेश विश्वकुमार यांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः रुग्णालयात गेले. तिथे त्यांनी डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि रमेश यांचे धैर्य पाहून त्यांचे कौतुक केले.या अपघातानंतर चौकशी प्रक्रियेला गती मिळाली आहे.

अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून, त्यामध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर आहे. यामधून टेकऑफ दरम्यान काय घडलं, पायलट्समधील संवाद, सिग्नल्स आणि तांत्रिक बिघाडांची माहिती समजण्याची शक्यता आहे. यामुळे अपघाताचं खरं कारण उलगडण्यास मदत होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!