अचानक वाढलेल्या दरात मोठी घसरण! सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ, जाणून घ्या दर…


पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या भावात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला आहे. आज देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर तब्बल घटले असून दहा ग्रॅम सोन्याची किंमत (जीएसटीसह) एक लाख ३२ हजार ७७० रुपयांपर्यंत आली आहे.

तसेच त्याचबरोबर चांदीचे दरही एका किलोमागे एक लाख ५८ हजार ९०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. दरांमध्ये झालेली ही घसरण पाहता सोन्या-चांदीत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

       

अमेरिकेत व्याजदर कपातीच्या शक्यतेमुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात चढ-उतार होत आहेत. व्याजदर कमी होण्याची अपेक्षा असल्याने डॉलर मजबूत झाला असून, याचा परिणाम थेट सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतातही उमटला आहे. देशातील प्रमुख सुवर्ण बाजारांमध्ये आज सोन्याचे दर एक लाख ३२ हजार ७०० ते एक लाख ३२ हजार ८०० रुपयांदरम्यान होते.

तज्ज्ञांच्या मते, डॉलर मजबूत झाल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यातून नफावसुली केली, ज्यामुळे किंमती घसरल्या. अनेक गुंतवणूकदार सध्या सोन्याच्या दरात स्थैर्य येईपर्यंत थांबण्याची भूमिका घेत आहेत. या पार्श्वभूमीवर अल्पकालीन काळात दरात आणखी किरकोळ घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर काल प्रतिऔंस ४,३८१ डॉलर होते. मात्र, आज ते साडेपाच टक्क्यांनी घसरून ४,११५ डॉलरवर आले आहेत. ही घसरण मागील काही आठवड्यांतील सर्वाधिक मानली जात आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता, डॉलरमधील मजबुती आणि गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेच्या दिशेने वाढलेली कलाटणी या सर्व घटकांचा परिणाम सोन्याच्या किमतींवर होत आहे.

तज्ज्ञांचे मत आहे की, सध्या जागतिक बाजारात झालेली घसरण तात्पुरती असली तरी वर्षाअखेरीस दर पुन्हा स्थिरावतील. भारतात दिवाळी आणि लग्नसराईचा हंगाम जवळ आल्याने मागणी पुन्हा वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!