आंध्र प्रदेशमधील साई भक्ताकडून शिर्डीत सोन्याचा मुकुट दान, जाणून घ्या किती आहे किमत..

शिर्डी : साईबाबांच्या खजिन्यात दिवसेंदिवस मौल्यवान हिरे, सोने चांदी याबरोबरच रोख स्वरुपात पैसे यांचे मोठे दान साईभक्तांकडून जमा होत आहे. साईबाबांच्या खजिन्यात दिवसेंदिवस मौल्यवान हिरे, सोने चांदी याबरोबरच रोख स्वरुपात पैसे यांचे मोठे दान साईभक्तांकडून जमा होत आहे.
ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं जीवनच पालटतं, अशा साईनाथांच्या चरणी पुन्हा एकदा एका भक्ताने भक्तीचा अनमोल नजराणा अर्पण केला आहे.
आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथील साईभक्ताने श्री साईचरणी ७८८.४४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे. या नव्या अर्पणामुळे साई संस्थानकडे असलेल्या सुवर्ण मुकुटांची संख्या आता २८ वर पोहोचली आहे.
श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, साईचरणी अर्पण केलेल्या मुकुटाची किंमत अंदाजे ६८ लाख रुपये असून मुकुट अर्पण करणाऱ्या भाविकांच्या इच्छेनुसार त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.
साईबाबांच्या दानपेटीत सोने, रोकड, जड जवाहीर दान केले जाते. शनिवारी (ता. १९) आंध्र प्रदेश मधील गुंटूर येथील साईभक्ताने श्री साईचरणी ७८८.४४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला आहे.
दरम्यान, सुंदर कोरीव कलाकुसर केलेला हा सुवर्ण मुकुट आकर्षक आहे. मुकुटाच्या मधोमध ‘ओम’ लिहिलेले असून त्यावरती हिरवा तर खाली लाल रंगाची टिकली आहे. विविध कलात्मक पद्धतीने बारीकसारीक कोरीव काम सुवर्ण मुकुटावर केल्याचे दिसत आहे.