जळगाव जिल्हा हादरला! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खून, मृतदेह गोठ्यातील चाऱ्यात लपवला अन्…


जळगाव : भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा खून करून तिचा मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामधून लपवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतील आरोपीला गुरुवारी (ता.३) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय-१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

मिळालेल्या माहिती नुसार, भडगाव तालुक्यातील एका गावात सात वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला होती. ३० जुलै रोजी पिडीत मुलगी दुपारी घरी एकटी असताना गावात राहणारा स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील याने पिडीत मुलीला गुरांच्या गोठ्यात बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर तिने घराच्या हा प्रकार सांगेल असे सांगितले. संशयित स्वप्निल पाटील याने मुलीसोबत जबरदस्ती केली, यात मुलीसोबत त्याची झटापट झाली. यादरम्यान स्वप्निलने दोनवेळा मुलीच्या डोक्यात गोठ्यात पडलेला दगड मारला.

याबद्दल कुणालाही संशय अथवा घटनेची माहिती मिळू नये म्हणून स्वप्निलने मुलीचा मृतदेह गोठ्यात असलेल्या गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवून दिला. दरम्यान मुलीचा शोध घेऊन देखील ती सापडत नसल्याने ती बेपत्ता झाल्यासह अपहरणाची तक्रार पालकांनी पोलीस स्टेशनला केली होती. त्यानुसार भडगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोन दिवसांपासून मृतदेह कडब्याच्या कुट्टीत असल्याने त्यातून दुर्गंधी येवू लागल्याने हा प्रकार १ ऑगस्ट रोजी उघडकीला आला. गुरांच्या चाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पद आढळून आल्याने खळबळ उडाली होती.

गावातील महिला व नातेवाईकांनी भडगाव पोलीस स्टेशन गाठून या ठिकाणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधी करणार नसल्याचा पवित्रा घेतला होता.

तसेच पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते. ज्या कडब्याच्या कुट्टीत मृतदेह मिळाला तो गोठा स्वप्नील विनोद पाटील (वय १९, रा. गोंडगाव ता. भडगाव) याचा असल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता.

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी स्वप्निल याला अटक केली, सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक सखोलपणे चौकशी केली असता, त्याने गुन्हा कबूल केला. ३० जुलै रोजी दुपारी सदर मुलीला आमिष दाखवून संशयिताने त्याच्या गोठ्यात बोलाविले.

नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर प्रकरण उघड होऊ नये म्हणून तिच्या चेहऱ्यावर दगड मारून तिची निर्घृण हत्या केली. मृतदेह त्याने गोठ्यातील कडब्याच्या कुट्टीखाली लपवून ठेवला होता. अशी कबूली पोलिसांना दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!