शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दूध अनुदान योजनेला एक महिन्याची मुदतवाढ..
पुणे : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याची योजना महाराष्ट्र सरकारने एक महिन्याने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी आदेशानुसार अनुदानाची मुदत १० मार्चपर्यंत सुरू राहील. यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून रुपये ५/ लिटर अनुदान मिळेल. या योजनेसाठी एका महिन्याच्या कालावधीसाठी २३० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल.
आर्थिक अडचणीच्या काळात दूध अनुदान योजनेला मुदतवाढीची मागणी आम्ही शासनाकडे केली होती. त्याचा सकारात्मक विचार करून देण्यात आलेल्या एक महिन्याच्या मुदतवाढीच्या शासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. त्यातून दूध उत्पादक शेतकर्यांसह सहकारी संघ व खासगी प्रकल्पांनाही मदतच झाली आहे.
Views:
[jp_post_view]