अभिजीत दिपके यांना मोठा धक्का! राजकीय कारकीर्द संपणार? बॉन्डवर सह्या केल्याने झाली अडचण, नेमकं काय घडलं?


नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके सतत चर्चेत आहेत. दिल्लीतील ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलन दिल्ली पोलिसांनी उधळून लावले. सीजेपीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिल्लीत दाखल झाले. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यापूर्वीच दिल्ली विमानतळावरून अभिजीत दिपके, साैरभ दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतले.

यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून पीस बॉन्ड सही करून घेतला. असे असताना आता सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश सोशल मीडियावर तूफान चर्चेत आहेत. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कंडेस काटजू यांनी सीजेपीच्या या तिन्ही नेत्यांवर निशाणा साधला. हेच नाही तर यांचे करिअर संपल्याचेही मोठे विधान त्यांनी केले.

याबाबत ते म्हणाले, कॉकरोच जनता पार्टीच्या टॉप चार नेत्यांनी अभिजीत दिपके,साैरभ दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य रहाणे या सर्वांनी पीस बॉन्डवर सही केल्या. यानुसार, हे स्पष्ट झाले की, ते कोणत्याही प्रकारच्या आंदोलनात सहभागी होऊ शकत नाहीत. त्यांनी शांती भंग केली आणि बॉन्ड मोडला आहे तर त्यांना अटक करून जेलमध्ये टाकले जाऊ शकते.

त्यांना जेलमध्ये राहण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते. त्यांच्या या निर्णयाने त्यांचे करिअर संपले आहे. बॉन्ड सही केल्याने त्यांच्या करिअरला धक्का बसला. अभिजीत दिपके यांच्यासह तिनही नेत्यांचे करिअर जवळपास संपले आहे, असेही सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशांनी म्हटले आहे. तसेच मी फक्त नेहा बोरा हिचे काैतुक करतो. तिने पीस बॉन्डवर सही करण्यास नकार दिला.

याबाबत तिने म्हटले की, शांतीपूर्ण आंदोलन करणे हा तिचा अधिकार आहे. आशुतोष रांका आणि साैरभ दास यांना 50-50 हजारांच्या बॉन्डवर सोडण्यात आले. जामीन मिळाल्यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी जंतरमंतरवर शिरून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे येणाऱ्या काळात त्यांना आंदोलन करण्यास काही अडचण येणार का हे समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!