धक्कादायक! नवर्षाच्या दिवशी घराला लागली भीषण आग, आगीत संपूर्ण कुटुंब संपलं…

बिहार : अनेकांमध्ये नवीन वर्षाचा मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. तसेच बिहारमध्ये नववर्षाचं सेलिब्रेशन करून पती-पत्नी आपल्या दोन चिमुकल्यांसह घरात निवांत झोपले. मात्र, रात्रीच्या वेळी घराला अचानक आग लागली. आग इतकी वाढली कि, या भीषण आगीत चौघांचाही होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
नीरज पासवान, कविता देवी, लव (वय ५) आणि कुश (वय ३) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती अद्याप समजलेली नाही. मात्र पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांना आग लाल्याची माहिती मिळताच सगळे जण लगेचच आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आग एवढी भीषण होती की, गावकऱ्यांना आग विझविण्यात अपयश आले. अंगावर काटा आणणारी ही धक्कादायक घटना बिहारच्या बेगुसरायमध्ये सोमवारी (१ जानेवारी) रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बचावकार्यास सुरवात केली. आग आटोक्यात आल्यानंतर चारही सदस्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.