पुण्यातील मुठा नदीच्या पुलावर भीषण अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू

पुणे : बाह्यवळण महामार्गावर वारजे येथील मुठा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात दुचाकी चालक तरुण मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजून ५० मिनिटांनी घडली आहे.
ऋतुजा दिलीप वायकर (वय- २३, रा.नऱ्हे आंबेगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.
ऋतुजा ही बावधन येथून महामार्गावरून घरी निघाली होती. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच हा अपघात कसा घडला याची माहिती असूनही मिळाली नसून पोलीस चैकशी करत आहेत. मुलीच्या वाहनांचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. त्यावरून, अज्ञात वाहनाने धडक दिली असावी. असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती घटनेतील वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली जात आहे. दुचाकीच्या क्रमांकावरून तिच्या वडिलांशी संपर्क झाला. ते तातडीने घटनास्थळी पोचले. तिला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.