Pune Crime : चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर, चॉकलेट देण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार


पुणे : घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कात्रज परिसरातुन समोर आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलीच्या २७ वर्षीय आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. याप्रकरणी २० ते २२ वर्षीय अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चार वर्षाची मुलगी वस्तीमधील लहान मुलांसोबत खेळत होती. आरोपीने मुलीला चॉकलेट देतो असे म्हणून तिला शेजारी असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन गेला. त्याठीकाणी मुलीसोबत अश्लील वर्तन केले. मुलगी रडू लागल्यानंतर तिला मारहाण केली.

तसेच रडली तर कापून टाकीन अशी धमकी दिली. पत्र्याच्या शेडमधून मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने परिसरात राहणाऱ्या तरुणाने शेडमध्ये गेला. तरुणाला पाहताच आरोपीने त्याला धक्का मारून पळून गेला आहे.

दरम्यान, पुढील तपास पोलीस निरीक्षक करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!