मोठी बातमी ! भाजपच्या गणेश बिडकरांसह तिघांवर मतदारांना पैसे वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल…!

पुणे : कसब्यात भाजपचे माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांनी मतदारांना पैसे वाटप केल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. काँग्रेसच्या स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर गणेश बिडकर यांच्यासह तिघांवर आदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालधक्का चौक येथील आयशा कॉम्प्लेक्स येथे काही भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याची काँग्रेस कार्यकर्ते फैयाज शेख यांनी दिली होती. माजी नगरसेवक गणेश बिडकर, मयूर चव्हाण, नइम शेख, बाला शेख हे मतदारांना मतदार स्लीप व पैसे वाटप करत असल्याची तक्रार देण्यात आली होती.तसेच पैसेवाटप होत असल्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. याची दखल घेऊन पोलिसांनी गणेश बिडकर यांच्या सह तिघांवर पैसे वाटप केल्याचा अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
Views:
[jp_post_view]