शिंदे गटाचे आमदार बांगर यांच्यासह ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल…!
हिंगोली : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी हाती आली आहे.आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीत प्राचार्यांना मारहाण करणं त्यांना चांगलच भोवलं आहे. शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.
याचबरोबर महाविद्यालयातील पाच अधिका-यांसह इतर ३० ते ४० जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण झाल्यानंतर तब्बल १० दिवसांनंतर आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी प्राचार्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अखेर १० दिवसांनंतर आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्यांना मारहाण करणे बांगर यांना चांगलेच भोवले आहे. त्या ठिकाणी आमदार बांगर यांनी सीसीटीव्ही यंत्रणेची सुद्धा तोडफोड केली होती. त्यामध्ये पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
कायमच कोणत्या-कोणत्या वादामुळे चर्चेत असणारे कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या मारहाणीचा पुन्हा एक व्हीडीओ समोर आला आहे. हिंगोली शहरालगत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली होती. आमदार संतोष बांगरच नाही तर बांगर यांचे कार्यकर्तेसुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हीडीओमध्ये दिसून येत होते.