लाडक्या बहिणींना दणका ; १५०० रुपये कायमचे बंद, तब्बल १० लाख अर्ज बाद

पुणे : महायुती सरकारकडून गेल्या वर्षी मोठ्या दणक्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेतून लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.सत्तेत आल्यानंतर 2100 रुपये देण्याचं आश्वासन देणाऱ्या या सरकारने आता लाडक्या बहिणींना चांगलाच ठेंगा दिला आहे.या योजनेतून जवळपास १० लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. त्यामुळे या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही,.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेत जवळपास दहा लाखांपेक्षा अधिक महिलांचे लाभ बंद झाले आहेत. महिलांनी याबाबत तक्रारीदेखील केल्या आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे.
त्यातूनच या महिलांचे अर्ज बाद केले असल्याचे समजत आहे. त्यामुळे या महिलांना आतापासून योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार नाहीत.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत निकषात न बसणाऱ्या अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामध्ये लाखो महिलांना समावेश आहे.त्यामुळे लाडक्या बहीणानां मोठा धक्का बसणार आहे.

लाडकी बहीण योजनेत फक्त निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांना योजनेता लाभ मिळणार आहे. या योजनेत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना योजनेचा लाभ घेता येतो. ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतात त्यांना या योजनेअंतर्गत पैसे मिळत नाही. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा आहे. त्यांनाही या योजनेतून वगळण्या आले आहेत. यासाठी महिला व बालविकास विभागाने प्राप्तिकर विभागाची मदत घेतली आहे. प्राप्तिकर विभागाच्या मदतीने या महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत.

