भाजपला होमपीचवरच धक्का! नागपूर शिक्षक मतदार संघात मोठा पराभव….!


नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला आहे. यामुळे आपल्या होमपिचवरच भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

नागपूर मतदारसंघातील सहा जिल्ह्यांमध्ये सरासरी ८६.२६ टक्के मतदान झाले होते. ३९ हजार ८३४ पैकी ३४ हजार ३५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वांनाच उत्सुकता लागलेल्या नागपूर मतदारसंघात अखेर महाविकास आघाडीचे सुधाकर अडबोले विजयी झाली आहेत.

याबाबत नाना पटोले यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका बसला, असे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार हे विजयाची हॅट्ट्रिक मारतात की सुधाकर अडबाले, राजेंद्र झाडे परिवर्तन घडवतात, याकडे राजकीय वतुर्ळाचे लक्ष लागले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!