Pune Crime : परीक्षा परिषदेच्या आयुष्य अखेर पोलिसांच्या जाळ्यात! शैलजा दराडे यांना ६ महिन्यांनी अटक, नोकरीच्या आमिषाने केलेली अनेकांची फसवणूक..


पुणे : नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणात शिक्षण विभागात मोठ्या पदावर असलेल्या शैलजा दराडे यांना अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. नोकरी लावण्याचे आमिष दाखवत दराडेंनी ४४ जणांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

तसेच यापूर्वी शिक्षण विभागात पैशाच्या मोबदल्यात नोकरीचे आमिष दाखवल्याने दराडे याना निलंबित करण्यात आले होते. त्यांनी राज्याच्या शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे घेतले होते. परंतु नोकरी न लावता फसवणूक केली. त्यावेळी शैलजा दराडे या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या प्रभारी आयुक्त होत्या.

पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. आता पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

शैलजा दराडे आणि त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे यांनी शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली होती. याबाबत पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रत्येकी १२ ते १५ लाख रुपये घेऊन ४४ उमेदवारांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले होते.

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपे जेरबंद झाल्यानंतर परीक्षा परिषदेचे आयुक्तपद होते. या आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार शैलजा दराडे यांच्याकडेच सोपविण्यात आला.

दराडे या उपायुक्त पदाचा कार्यभार सांभाळत होत्या. परीक्षा परिषद ही स्वायत्त संस्था आहे. यावर कोणाचेही फारसे नियंत्रण नसल्यामुळे परिषदेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला होता. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपे जेलमध्ये गेले. यानंतर आता शैलजा दराडे यांना देखील फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!