बहिणीचा लिव्हइन पार्टनर, भावाने उचलले टोकाचे पाऊल, हातोडा घेतला अन्…., घटनेने उडाली खळबळ


मुंबई : आपल्या बहिणीच्या लिव्ह इन पार्टनरला हातोड्याने मारहाण करून ठार केल्याची धक्कदायक घटना उघडकीस अली आहे. याप्रकरणी तीन जणांना ठाणे जिल्ह्यातील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

शोएब शेख, इर्शाद शेख आणि त्यांचा मित्र हेमंत बिछवडे अशी आरोपींची नावे आहेत. शाहबाज शेख (वय. २५) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, शोएब आणि इर्शादची बहीण मुमताज शाहबाज शेख नावाच्या तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते आणि दोघांना दोन मुलेही होती. मुमताजचा घटस्फोट झाला आहे. शुक्रवारी तो घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी कल्याणमधील खडकपाडा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद केली.

तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा संशयाची शोएब आणि इर्शाद यांच्याकडे वळली. त्यांचा मित्र हेमंत बिछवडे हाही पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन कडक चौकशी केली असता तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.

बहिणीचा लिव्ह इन पार्टनर मुमताज शेख बहिणीशी अनेकदा भांडण करत असे. तसेच त्याची बहीण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याने कुटुंबीय नाराज होते. मुमताज आणि त्याच्या बहिणीचे शुक्रवारी पुन्हा भांडण झाले.

भांडणामुळे मुमताज आपल्या एका मुलासह टीटवाळा येथे राहणाऱ्या आई-वडिलांच्या घरी जाण्यासाठी घरातून निघून गेला होता. वाटेत शोएब आणि इर्शादने त्यांचा मित्र हेमंतने त्याला पकडले. मुला

ला घेऊन तिघे घराबाहेर पडले आणि मुमताज याला जबरदस्तीने सोबत घेऊन गेले. यानंतर आरोपींनी मुमताज याला हातोड्याने मारहाण केली. त्याचा मृतदेह कल्याणमधील उल्हास नदीत फेकून दिला. पावसामुळे नदीचा प्रवाह वेगवान असल्याने मृतदेह शोधण्यात अडचणी येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांचे पथक मृतदेह शोधण्यात गुंतले आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!