मारुतीरायाच्या डोळ्यात अश्रू! बातमी तुफान व्हायरल, मंदिरात मोठी गर्दी, पाहतात तर…

लखनऊ : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एका मंदिराचा व्हिडीओ व्हरायल झाला आहे. या मंदिरात असलेल्या हनुमानाच्या मूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू येत असल्याचा दावा काहींनी केला.

दावा करणाऱ्यांनी व्हिडीओ काढला. तो व्हायरल झाला. त्यानंतर मंदिरात तोबा गर्दी उसळली. आस्थेपोटी कित्येक जण मंदिरात पोहोचले. त्यांनी जय श्रीराम, जय हनुमान अशा घोषणा दिल्या. रामाच्या नावाचा जयजयकार सुरू झाला. मारुतीरायाच्या डोळ्यातून अश्रू येताहेत.
याचा अर्थ कोणाच्या हातून काहीतरी चूक झाली आहे, असा सगळ्यांचा समज झाला. त्यामुळे पुजारी आणि स्थानिकांनी हनुमानाची क्षमा याचना सुरू केली.

उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील फतेहगंजमधील बिहडमधील घनदाट जंगलात हनुमानाचं प्राचीन मंदिर आहे. स्थानिकांची या हनुमानावर अपार श्रद्धा आहे. या मूर्तीच्या डोळ्यांमधून पाणी येत असल्याचं काही भक्तांच्या लक्षात आलं.
ही बातमी आसपासच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. भाविकांनी मंदिरात तोबा गर्दी केली. हनुमानाच्या दोन्ही डोळ्यांमधून पाणी येत असल्याचं त्यांनी पाहिलं.
आधी हनुमानाच्या एकाच डोळ्यातून पाणी येत होतं. मात्र काही वेळात दुसऱ्या डोळ्यातही पाणी येऊ लागलं. त्यामुळे भक्तांना धक्काच बसला. त्यांनी मारुतीची क्षमा मागत प्रार्थना सुरू केली.
मंदिरात असलेली हनुमानची मूर्ती अतिशय प्राचीन आहे. राजा महाराजांचं राज्य असताना या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती, असं आसपास राहणाऱ्यांनी सांगितलं. काहीतरी अनर्थ घडणार होता. त्याचमुळे हनुमानाच्या डोळ्यांतून अश्रू येत आहेत. मारुतीरायामुळे मोठं संकट टळलं आहे. देवाची लीला देवच जाणे, अशा भावना भक्त व्यक्त करत आहेत.