देशात आज अतिवृष्टी? कोकण, मध्य महाराष्ट्र, गोवा, गुजरातमध्ये दिला इशारा..


नवी दिल्ली : देशाच्या विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

तसेच, देशातील अनेक राज्यांमध्ये सोमवारीही हलक्या ते मुसळधार पावसाची नोंद झाली. हवामान खात्याच्या पुढील चार दिवसांच्या अंदाजानुसार गुजरातला पावसापासून दिलासा मिळू शकेल, परंतु १२ राज्यांसाठी मान्सून संकटात आणखी भर घालणार आहे.

दरम्यान, हवामान खात्याने हवामानाच्या हालचाली पाहता आज उत्तराखंड, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि किनारी कर्नाटक या १२ राज्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मान्सूनचा प्रवाह सतत सक्रिय असून तो त्याच्या सामान्य स्थितीपासून दक्षिणेकडे सरकत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत पश्चिमेकडील भाग हळूहळू उत्तरेकडे सरकण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण ओडिशा आणि लगतच्या भागात त्याच्या खालच्या स्तरावर चक्रीवादळाचे परिवलन देखील दिसत आहे.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार, पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाचे परिवलन आहे, जे समुद्रसपाटीपासून ५.८ ते ७.८ किमी उंचीवर आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत याच प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!