काय सांगता! चक्क चोरटयांनी टोमॅटोने भरलेली गाडी चोरली, धक्कादायक प्रकार आला समोर..


बंगळुरु : टोमॅटोचे भाव वाढल्याने त्याच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होईला लागल्या आहेत. अशीच एक घटना कर्नाटकातील बेंगळुरू समोर आली आहे. टोमॅटोने भरलेली गाडी चोरट्यांनी चोरली. टोमॅटोचे २१० कॅरेट गाडीत भरले होते.

आश्चर्याची बाब म्हणजे चोरट्यांनी ही चोरीची घटना इतक्या हुशारीने घडवून आणली की, शेतकरी आणि वाहन चालकाला सुगावाही लागला नाही. या प्रकरणी पोलिसांनी या दाम्पत्याला तामिळनाडूतून अटक केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, ही घटना बेंगळुरूच्या एपीएमसी यार्ड पोलीस स्टेशन परिसरातील आहे. चित्रदुर्ग जिल्ह्यातील हरियार येथील शेतकरी शनिवारी मध्यरात्री बोलेरो कारमधून लाखो रुपये किमतीचे टोमॅटो कोलार मार्केटमध्ये घेऊन जात होते.

बाजारात जात असताना बोलेरो कारची रस्त्यावरील दुसऱ्या कारला धडक बसली. या धडकेत कारच्या विंडशील्डचा चक्काचूर झाला. त्यावरून कारमधील लोक आणि बोलेरोमध्ये बसलेले चालक व शेतकरी यांच्यात हाणामारी झाली. या नुकसानीच्या बदल्यात कार स्वार दोघांकडून १० हजार रुपयांची मागणी करत होते. कारस्वाराने जबरदस्ती केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, रस्वाराने बोलेरो चालक आणि शेतकऱ्याला बळजबरीने वाहनातून काढून टोमॅटो भरलेले वाहन घेऊन पळ काढला. यानंतर पीडितांनी पोलिसांत तक्रार केली. वाहनात टोमॅटोचे २१० कॅरेट भरले होते, त्याची किंमत सुमारे दोन लाख रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी भादंवि कलम ३७९ (चोरी) आणि ३९० (दरोडा) अन्वये गुन्हा दाखल केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!