इर्शाळवाडी दुर्घटना : अजित पवार यांनी वाढदिवस न साजरा करण्याचा घेतला निर्णय, कार्यकर्त्यांना केले आवाहन


मुंबई : रायगड जिल्हातील खालापुर तालुक्यातील इर्शाळवाडी या गावावर संकट कोसळलं. इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली.

यामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली आहेत. अशातचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक आवाहन केलंय.

अजित पवार यांचा वाढदिवस दरवर्षी कार्यकर्ते साजरा करतात. यंदा हा खर्च न करता इर्शाळवाडीच्या पुनर्उभारणी करण्यात खर्च करावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये.

पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

इर्शाळवाडीवर कोसळलेल्या या दरडीमुळे आतापर्यंत अद्याप १० लोकांना आपला जीव गमवावा लागला. बचावपथकाला ९८ लोकांना वाचवण्यात यश आलंय, तर शेकडो लोक अजूनही मातीच्या ढिगाऱ्यात अडकल्याचे शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!