पुरंदर तालुक्याची वरदायिनी पुरंदर उपसा योजनेला ४६० कोटी रुपये खर्चास मान्यता ; दौंड, पुरंदर व इंदापूर तालुक्यातील ६३ गावांना लाभ…!

उरुळी कांचन : पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेस ४६० कोटी रुपयांची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे दौंड व पुरंदर व इंदापूर तालुक्यातील ६३ गावांना या योजनेतून लाभ मिळणार आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेस ४६० कोटी रुपयांची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता मंगळवारी ३१ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, पुरंदर व बारामती या चार अवर्षण प्रवण तालुक्याच्या भागातील ६३ गावात २५ हजार ४९८ हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
याकामी आमदार राहुल कुल , माजी जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे यांनी यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, पुरंदर व बारामती या चार तालुक्यातील शेतकरी व नागरिकांचा शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
या महत्वपूर्ण निर्णयासाठी आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.