आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या अडचणीत; म्हणाले, माझीही चौकशी…

मुंबई : राज्यातील भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. यामुळे अनेकांनी यावर चौकशी करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणामुळे अनेकांची चौकशी करणारे सोमय्या आता स्वतःच अडचणीत आल्याचे चर्चा सुरू झाली आहे. याबाबत सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चौकशीची मागणी देखील केली आहे.
सोमय्या म्हणाले, व्हिडिओ बनावट आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. हा व्हिडिओ एका मराठी वाहिनीने अस्पष्ट करून प्रकाशित केला आहे. हा व्हिडिओ त्यांच्या हाती असल्याचा दावा चॅनल करत आहे.

ज्यामध्ये किरीट सोमय्या आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. मात्र, हा व्हिडीओ राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप करत सोमय्या यांनी या व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी केली. सोमय्या यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले.
यामध्ये त्याने हा व्हिडिओ फेक असल्याचे म्हटले आहे.
यासोबतच त्यांनी फुटेजची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आपली प्रतिष्ठा खराब करण्याच्या उद्देशाने हे सर्व केले जात असल्याचे सोमय्या यांचे म्हणणे आहे.