मोठी बातमी! दोन दिवसात होणार मंत्रिमंडळ विस्तार, शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्यांची नावे झाली फायनल…


मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा सुरू येत्या एक दोन दिवसात हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

तसेच आता शिंदे गटाच्या मंत्र्यांची नावे समोर आली आहे. कोकणातून उदय सामंत, दीपक केसरकर यांच्यानंतर आदिती तटकरे यांना संधी देण्यात आली आहे.

मात्र मंत्रिपदाची इच्छा यापूर्वीच व्यक्त केलेले शिवसेनेचे महाडचे जेष्ठ आमदार भरत गोगावले यांचा अद्याप मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही.

यामुळे आता त्यांना संधी दिली जाणार आहे. यामध्ये मंत्रिमंडळाच्या विस्तारात भरत गोगावले यांचे नाव निश्चित झाले आहे. गोगावले यांना मंत्रिमंडळ स्थान मिळाल्यास कोकणात उदय सामंत, आदिती तटकरे व दीपक केसरकर अशी चार मंत्रीपदे वाट्याला येतील.

डॉ बालाजी किणीकर, संजय शिरसाट, भरत गोगावले यांचा समावेश होणार असल्याची माहिती आहे. तसेच अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते देण्यास शिवसेना व भाजप या दोघांचाही विरोध आहे.

दरम्यान, त्यांच्याकडे महसूल खाते देण्यात येईल, अशी सूत्रांची माहिती आहे. शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार, डॉ तानाजी सावंत आणि संदीपान भुमरे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!