ऑनलाइन रमी खेळून २० हजार गमावले आणि उचलले टोकाचे पाउल, पुण्यात उडाली खळबळ…


पुणे : सध्या मोबाईल घरबसल्या पैसे कमवा अशा प्रकारे सांगून ऑनलाइन गेम खळण्यास आपल्याला भाग पाडले जाते. मात्र यामध्ये अनेकांनी लाखो रुपये आणि आपला जीव देखील गमावला आहे. अनेकजण या खेळात कर्जबाजारीही होत असतात. मात्र, तरीही अनेक तरूण अशा प्रकारच्या गेम खेळत असतात.

त्यामुळे लगेच पैसे कमवण्याच्या नादात अनेक तरूण या खेळाकडे आकर्षित होत आहेत. मात्र, या ऑनलाईन रमी गेमच्या नादात एकाने टोकाचे पाऊल उचलत आपले आयुष्य संपवल्याची घटना उघडकीस आली आहे.

पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरात ही घटना घडल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन रमी गेममध्ये तो २० हजार रुपये हारल्याने त्याने उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे. गणेश सोमनाथ काळदंते असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

गणेश हा कॅब चालक होता. स्वत:ची गाडी तो चालवत होता. मात्र, त्याला ऑनलाईन रमी खेळण्याचे व्यसन लागले होते. अनेकदा तो सतत ही गेम खेळताना दिसत होता. गेम खेळताना तो एकदम २० हजार रुपयांची रक्कम हरला त्यामुळे तो तणावाखाली आला होता.

त्यामुळे त्याने हे गळफास लावून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. यामुळे आता या गेमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ऑनलाईन गेममुळे अनेकांना आपले सर्वस्व गमवावे लागले आहे. अनेकजण या गेममुळे कर्जबाजारी झाल्याने रस्त्यावर आले आहेत. तर काहीजणांनी आपले जीवन संपवले आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!