मोठी बातमी! लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर, १ ऑगस्टला मोदींचा पुणे दौरा..

पुणे : यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. रोहित टिळक यांनी ही घोषणा केली आहे. पुण्यात होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत राहणार आहे.
तसेच १ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे १ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवारांना देखील आमंत्रण देण्यात येणार असल्याचे रोहित पवारांनी सांगितले आहे.
त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थितीत राहणार आहेत. त्यामुळे सत्तानाट्यानंतर पहिल्यांदात राजकीय नेत्यांची मोठी फळी या कार्यक्रमासाठी एकाच मंचावर येणार आहेत
दरम्यान, दर वर्षी पुण्यात १ ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट वतीने पुरस्कार दिला जातो. टिळम महाराष्ट्र ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती आहे.