उद्धव ठाकरेंना ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ परत मिळणार?, ‘या’ तारखेला होणार सुप्रीम कोर्टाची सुनावणी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात अचानक केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्याच्या राजकारणाला नवे वळण मिळाले.

शिंदे यांनी दुसऱ्या कोणत्या पक्षात न जाता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देत थेट शिवसेनेवर दावा सांगितला. त्यामुळे शिवसेना नक्की कोणाची, हा प्रश्न सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
अशातच शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय आयोगाने दिला. त्याविरोधात ठाकरे गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की ३१ जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी करु. उद्धव यांच्या याचिकेत निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.