देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींची थुंकी झेलून…, सामनातून फडनवीसांना पुन्हा एकदा डिवचलं..

मुंबई : अजित पवार यांच्या बंडानंतर राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच आता पुन्हा एकदा सामना या दैनिकातून भाजपवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोंदींची थुंकी झेलून मी पुन्हा येईन, असे म्हणाले होते.

परंतु ते येताना दोघांना घेऊन आले. हे दोघे म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार. या दोघांवरही भ्रष्टाचाराचे खूप आरोप आहेत. त्यामुळे मी येताना भ्रष्टाचार आणि लुटीचा माल घेऊन येईल असे फडणवीस यांना म्हणायचे असावे, अशी बोचरी टीका दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
काँग्रेस म्हणजे लूट की दुकान, झूठ का बाजार है, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातून केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या टीकेवर दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून पलटवार करण्यात आला आहे. काँग्रेस लूट की दुकान नाहीये तर भाजपच लूट कि दुकान आहे.

काँग्रेस आणि इतर पक्षाच्या लुटीचा माल घेऊन भाजप आपलं घर का भरत आहे? असा सवाल करतानाच भाजप हाच राष्ट्रीय चोर बाजार झाला आहे. लुटीचा माल विकत घेणारा पक्ष म्हणून भाजप बदनाम झाला आहे, असा घणाघात दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
खरंतर भाजप हाच आता राष्ट्रीय चोर बाजार झाला असून आता तो चोरीचा, लुटीचा माल विकत घेणारा पक्ष म्हणून बदनाम झाला आहे. भ्रष्टाचाऱ्यांना व्यापारी वृत्तीने पाठीशी घालणे हा एक ‘गुजरात पॅटर्न’ संपूर्ण देशभरात लागू होताना दिसत आहे, अशी टीका सामनातून केली आहे. त्यावर आता भाजप कशाप्रकारे उत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.