लोणीकंद पोलीस पथकाची रोड रोमियोंवर कारवाई! ७ बुलेटसह ९ वाहनांवर कारवाई…


वाघोली : शाळा, कॉलेज परिसरामध्ये घिरट्या घालणाऱ्या रोड रोमियोंवर लोणीकंद पोलीस तपास पथकाने वाहतुक पोलिसांच्या मदतीने कारवाई केली आहे.

सोळा वाहनांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच मागील दोन दिवसांपासून कारवाईचे सत्र सुरूच असल्याने रोमियोंची चांगली हवा उडाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, वाघोली येथील शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात बुलेटच्या सायलेन्सर मध्ये बदल करून कर्ण कर्कश आवाज काढून हिरोगिरी करणाऱ्यांवर लोणीकंद तपास पथकाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.

तसेच विना परवाना वाहन चालवणे, ट्रिपल सीट, बुलेटच्या सायलेन्सर मध्ये बदल करणे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, वेडीवाकडी गाडी चालवून शाळा व महाविद्यालय परिसरात धुमाकूळ घालणाऱ्यांमुळे पालकांची चिंता वाढली होती.

दरम्यान, लोणीकंद पोलीस तपास पथकाने वाहतूक शाखा पोलिसाच्या मदतीने हिरोगिरी करणाऱ्यांना ताब्यात घेवून ७ बुलेट व ९ अन्य वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे पालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. अशीच कारवाई नियमितपणे सुरु राहावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!