शरद पवार की अजित पवार, सर्वात जास्त संपत्ती कोणाकडे, जाणून घ्या श्रीमंतीच्या बाबतीत कोण आहे पुढे..


मुंबई : राज्याच्या राजकारणात दुसऱ्यांदा भूंकप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाले. त्यांचा राष्ट्रवादीवर दावा सुरु आहे. राजकारणाची नाडी ओळखणारे शरद पवार यांना घरातूनच आव्हान मिळाले.

अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकले. पार्टीत उभी फूट पडली. त्यातही अजित पवार, जास्त संख्याबळाच्या जोरावर दादा ठरले. शरद पवार गटापेक्षा त्यांच्या बाजूने जास्त आमदार आहेत. राजकारणात काकाला धोबीपछाड देण्याच्या तयारीत ते आहेत

अजित पवार पाचव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. राष्ट्रवादीचे दोन तृतीयांशहून अधिक आमदार आपल्यासोबत असल्याचा त्यांचा दावा आहे.

हायस्कूलपर्यंत शिकलेले अजित पवार शरद पवार यांच्याकडून राजकारण शिकले आणि आता त्यांच्यासोबत राजकीय क्षेत्रात काम करत आहेत. पहिल्या फेरीत फक्त अजित पवार लढताना दिसत आहेत. अजित पवार हे राजकारणाबरोबरच व्यवसायातही निष्णात खेळाडू आहेत.

तसेच या दोन्ही नेत्यांकडे अफाट संपत्ती असल्याचे बोलले जाते. पण, निवडणूक प्रतिज्ञापत्र वेगळेच वास्तव सांगत आहे. २०२० मध्ये राज्यसभा निवडणूक लढवताना शरद पवार यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती केवळ 32.73 कोटी रुपये आहे.

२०१४ च्या तुलनेत २०२० मध्ये त्यांची संपत्ती केवळ ६० लाख रुपयांनी वाढली. एकूण ३२.७३ कोटींच्या मालमत्तेपैकी त्यांच्याकडे २५.२१ कोटी रुपयांची जंगम आणि ७.७२ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता होती.

अजित पवार यांच्या २०१९ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे एकूण ७५.४८ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. अशा प्रकारे ते त्यांचे काका शरद पवार यांच्यापेक्षा दुप्पट श्रीमंत आहेत. अजित पवार यांच्याकडे २३.७५ कोटी रुपयांची जंगम आणि ५१.७५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

स्थावर मालमत्तेत अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे २.६५ कोटी रुपयांची शेतजमीन, १६.४५ लाख रुपयांची बिगरशेती जमीन आणि २१.७८ कोटी रुपयांची निवासी इमारत आणि १०.८५ कोटी रुपयांची व्यावसायिक मालमत्ता आहे.

दरम्यान, २०१९ च्या प्रतिज्ञापत्रानुसार अजित पवार यांच्यावर सुमारे ३. ७३ कोटी रुपयांचे कर्ज आहे. अशा प्रकारे तुलनेत शरद पवार यांच्यापेक्षा अजित पवार यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!