आंध्रप्रदेशातून गांजाची तस्करी करताना फरार झालेल्या मुख्य आरोपीला बारामतीतून बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


पुणे : आंध्रप्रदेशातून गांजाची तस्करी करताना फरार झालेल्या मुख्य आरोपीला बारामतीत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणच्या पथकाने केली आहे.

फिरोज अजीज बागवान (रा. बारामती ता. बारामती जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पदेरू पोलीसांनी अवैध गांजाची राजू तस्करी करणारी महिंद्रा XUV ५०० ही मधून ४०० किग्रॅ वजनाचा गांजा जप्त केला आहे.

सदर कारवाई दरम्यान पदेरु पोलीसांनी आरोपी मताम सीमाद्री रामचंद्र पाडल, अलुरी सिताराम राजू यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच आरोपी फिरोज अजीज बागवान पळुन गेला असल्याने एनडीपीएस कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला.

त्यानंतर सदर गुन्हयातील आरोपी फिरोज बागवान हा बारामती परीसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारामती परीसरात सापळा रचून गुन्हयातील मुख्य आरोपी फिरोज अजीज याला ताब्यात घेतले. आरोपीला पदेरू पोलीस ठाण्याच्या अधिकारी व स्टाफ यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोसई अभिजीत सावंत सहा फौजदार हनुमंत पासलकर, बाळासाहेब कारंडे, पोहवा अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, हेमंत विरोळे यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!