आता ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्हीही सेनांचे आमदार संकटात! आमदार अपात्रतेबाबत अध्यक्षांनी बजावल्या नोटिसा…


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. आता
विधानसभेच्या अध्यक्षांनी शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस बजावली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ४० आमदारांना आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना विधानसभेच्या सदस्यत्वाच्या अपात्रतेबाबत उत्तर मागण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

यामुळे येणाऱ्या काळात आता अनेक मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या सर्वांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ७ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

राज्यातील १६ आमदारांच्या अपात्रतेवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले जावेत, अशी याचिका ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या उलथापालथी सुरू आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या गटाने शिंदे सरकारमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आता हे 16 आमदार अपात्र होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर सत्ता संघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. याबाबत आता अंतिम निर्णय समोर येईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!