हे तर पवार कुटुंबाच नाटक!! बारामतीत 40 वर्ष पवारांच्या सोबत असलेला नेता अखेर बोलला, भाजपलाही सुनावले खडे बोल…

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांनी वेगवेगळ्या वाटा निवडल्यानंतर आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यामध्ये आता तब्बल 40 वर्ष शरद पवारांची साथ देणारे आणि आता कट्टर विरोधक असलेले चंद्रराव तावरे मोठे वक्तव्य केले आहे.
ते म्हणाले, राष्ट्रवादीतील फूट हे पवार कुटुंबाचे नाटक आहे. कुटुंब वाचवण्यासाठी केलेल्या हा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त केले आहे. आपण त्यांना खूप जवळून ओळखतो. त्यामुळे हे सर्व नाटकच असून येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल, असे चंद्रराव तावरे यांनी म्हटले आहे.
तसेच भाजपने केवळ बारामतीचेच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे नुकसान केले आहे असा आरोप देखील त्यांनी लावत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. भाजपने अत्यंत मोठी चूक केली असून ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणा हाताशी धरून दुसऱ्या पक्षातील नेते आपल्या पक्षात घेऊन फार मोठी घोडचूक केली आहे.
त्याची किंमत भारतीय जनता पक्षाला मोजावी लागेल. शरद पवार यांनी सुरुवातीच्या काळात अत्यंत चांगले काम केले. 18-18 तास काम केले. जशी जशी राजकीय सत्ता मिळेल. तशी तशी त्यांची वर्तन बदलत गेले.
तसेच पवारांचे राजकारण कोणालाच लवकर कळणार नाही, असा आरोप चंद्रराव तावरे यांनी केला आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात काय चित्र दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, तावरे हे शरद पवार यांच्या सुरुवातीच्या राजकीय कारकिर्दीपासून त्यांच्याबरोबर होते. मात्र नंतरच्या काळात त्यांचे संबंध बिघडले. यामुळे आता ते कट्टर विरोधक झाले आहेत.