महिलेसह फ्लॅटमध्ये बंद होते १६ कुत्रे, ३ वर्षांनी दरवाजा उघडताच दिसलं धक्कादायक दृश्य…

नवी दिल्ली : एका महिलेच्या फ्लॅटमधून १६ कुत्र्यांची सुटका करण्यात आल्याची अजब घटना समोर आली आहे. या महिलेनं अनेक वर्षांपासून या कुत्र्यांना आपल्या फ्लॅटमध्ये कोंडून ठेवलं होतं. आश्चर्य म्हणजे महिलेच्या फ्लॅटमध्ये वीजपुरवठा देखील नव्हता.

तर, संपूर्ण फ्लॅट कुत्र्यांच्या मलमूत्राने भरला होता. फ्लॅटच्या आत इतका उग्र वास येत होता, की त्यात क्षणभरही उभे राहणे कठीण होते. महिलेची अवस्थाही चांगली नव्हती. यानंतर सर्च वॉरंट जारी करून कुत्र्यांची सुटका करण्यात आली. ही अजब घटना दिल्लीतून समोर आली आहे.
दिल्ली एमसीडीला माहिती मिळाली होती की GK-I पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या GK-I मधील आयबीएचएएस सोसायटीच्या बी-ब्लॉकमधील फ्लॅटमध्ये एक महिला राहते. २-३ वर्षांपासून महिलेनं १५ ते १६ कुत्रे आपल्या फ्लॅटमध्ये बंद करून ठेवले होते. फ्लॅटमध्ये वीजपुरवठाही नव्हता. यासोबतच महिलेच्या

फ्लॅटमधून भीषण दुर्गंधी येत होती. माहिती मिळताच एमसीडीची टीम महिलेच्या घरी पोहोचली. फ्लॅटच्या आत गेल्यावर त्यांना दिसलं, की तिथे बरीच कुत्री आहेत आणि फ्लॅटमध्ये सर्वत्र घाण पसरलेली आहे. फ्लॅटकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर कुत्र्याचे मलमूत्र पडलेले होते.
फ्लॅटमध्ये इतका उग्र वास येत होता की क्षणभरही उभे राहने कठीण होत होते. त्याचवेळी फ्लॅटमध्ये असलेल्या कुत्र्यांचीही स्थिती चांगली नव्हती. त्यांना योग्य आहार मिळत नव्हता.
त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. एमसीडी टीमने महिलेला कुत्र्यांना त्यांच्या उपचारासाठी SPCA/MCD टीम्सकडे सोपवण्याची विनंती केली, परंतु महिलेने ते मान्य केले नाही.