शिरूरचे राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांची राजकीय दिशा ठरली! अजित पवार की शरद पवार? थेट उत्तर सांगितलं…


शिरूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी (ता. २ जुलै) शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यासाठी विश्वासात न घेता सह्या घेतल्याचा दावा आमच्या खोट्या सह्या घेतल्या गेल्या असा दावा शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केला आहे.

राजभवनात रविवारी अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांचा मंत्री म्हणून शपथविधी झाला. या सर्व प्रक्रियेत शिरूरचे आमदार ॲड. अशोक पवार हे अजितदादांसमवेत दिसत होते. अजितदादांच्या यापूर्वीच्या बंडाच्या आणि पहाटेच्या शपथविधीवेळी मात्र, आमदार पवार यांनी आम्ही पवार साहेबांसोबत अशी स्पष्ट भूमिका घेतली होती.

त्यानंतर आता शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार सिल्व्हर ओक या बंगल्यावर दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी हे प्रतिपादन केले आहे. सह्या आमच्या घेतल्या आहेत.

मात्र आम्ही ते वाचले नसल्याचा दावाही आमदार पवार यांनी केला आहे. तसेच आमदार सरोज अहीरे व आमदार किरण लहमटे ही पवार साहेबांसोबतच सिल्व्हर ओक वर दाखल झाले आहेत. तर आजच्या बैठकीच्या नियोजनासाठी खासदार सुप्रिया सुळे या वाय. बी. चव्हाण सेंटर येथे दाखल झाल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!